1. स्वामी विवेकानंदाच बाल जीवन
2. स्वामी विवेकानंदांची गुरूशी भेट
3. स्वामी विवेकानंदाच बाल जीवन - Swami Vivekananda Biography In Hindi
4. Swami Vivekanand का Jeevan संघर्ष और सफलता की Kahani
रामकृष्ण यांच्या कडे ज्ञान घेत नरेंद्राने अभ्यास - व्याव्याम - आणि लोकसेवा करण्यास तीव्र गतीने चालू लागला. रामकृष्णांनी त्याला अष्टसिद्धी देऊ केले परंतु नरेंद्राने प्रश्न केला - या सिद्धी ने मी ईश्वराचे दर्शन करू शकतो का ? रामकृष्ण म्हटले - नाही, परंतु या सिद्धीने तुझी कोणतीच भौतिक वासना/ईच्छा अपूर्ण राहणार नाही।
तेव्हा नरेंद्र म्हणाला - अशा सिद्धीची मला आवश्यकता नाही. ( म्हणजेच किती हि पैसे - सत्ता - वैभव - मिळत असताना त्याला लात मारून ईश्वराचे कार्य आणि दर्शन करण्याची ओढ असणारे परम प्रतापी तेजस्वी असे विवेकानंद होते.
तरुण अवस्थेत असताना नरेंद्राने सन्यास घेतला - आणि सलग पाच ते सहा वर्ष त्यांनी भारत भ्रमण केले आणि त्यातून भारताचे निरीक्षण करत लोकसेवा करत राहिले आणि शेवटी ते कन्याकुमारी च्या टोकाला जाऊन पोचले आणि तिथे खडकापर्यंत पोहत गेले चारही बाजूनी समुद्राच्या लाटा असणाऱ्या खडकावर जाऊन तिथे ते ध्यानस्थ बसले.
ध्यान करते वेळी त्यांच्या अंतःचक्षूसमोर भारताचे गरीब - पीडित लोक त्यांचं जीवन - असे चित्र दिसू लागले तेव्हा त्यांनी तिथेच संकल्प घेतला कि मी माझ्या देश बांधवांचा उद्धार करिन.
5. Swami Vivekananda Chicago Speech in Hindi
स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) हे विश्वधर्म परिषद ला जाण्यास निघाले त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले जसे कि, भिक्षा मागणे - कडक थंडीत जाणे - असे कित्येक समस्या त्यांच्या समोर आल्या कि तेथे जाण्याचे दरवाजे बंद होताना दिसतात इथं पर्यंत समस्या आल्या पण ते थांबले नाही, आखिर ते ११ सप्टेंबर १८९३ ला शिकागो इथे हॉल ऑफ कोलंबस या ठिकाणी होणाऱ्या परिषदेला जाऊन पोहोचले.
ladies and jentlmen अशा वाक्यांनी सुरुवात होणाऱ्या आणि परिचित असणाऱ्या ४००० रा हुन जास्त लोकांसमोर स्वामी विवेकानंदानी ( my brothers and sisters of america ) या शब्दांनी सुरुवात केली तेव्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत टाळ्या वाजत होत्या. आणि जे व्याख्यान तयानी त्या ठिकाणी केलं ते वाचण्या सारखं आहे.
6. भारतीय संस्कृतीचं दर्शन करवणारे स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदानी जे व्याख्यान त्या परिषदे मध्ये केले त्यात त्यांनी, भारतीय संस्कृतीचं - वेदांच - उपनिषद आणि भगवद्गीतेच दर्शन स्पष्ट दर्शन त्यांनी तिथे सर्वाना करवून दिल।
ज्यांना भगवद्गीता सुद्धा माहित नाही असे लोक तर आश्चर्यचकित झाले, इतका महान भारतातील तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचे तेजस्वी विचार घेऊन जाणारे पहिले भारतीय हे स्वामी विवेकानंद होते.
तिथल्या एका कुटुंबाने स्वामी विवेकानंदांच्या वेषभूषेवर अर्थात कपड्यावर टीका केली तेव्हा स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) त्यांना म्हणाले - In Your Country Tailor Makes Personality But In My Country Charachter makes Personality.
( तुमच्या देशात शिंपी हा व्यक्तित्व निर्माण करतो परंतु माझ्या देशात चारित्र्य हे व्यक्तित्व निर्माण करते).
तसेच एका स्त्रीने त्यांच्या समोर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला कारण, तिला स्वामी विवेकानंद सारखा तेजस्वी बालक पाहिजे होता, तेव्हा स्वामी विवेकानंद तिला म्हटले, हे माते तू मलाच तुझा पुत्र समज. असे तेजस्वी विचार असणारे स्वामी विवेकानंद होते.
आज भारताचं तेज - व्यक्तित्व - चारित्र्य जणू विलुप्त झालं आहे जीर्ण झालं आहे, जिथे तिथे स्त्रीकडे भोग दृष्टीने बघणारे मनुष्य रूपात असणारे राक्षसच दिसत आहेत. हि आपल्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे)!
7. स्वामी विवेकानंदानी: Ramkrishna Mission ki sthapna kab hui
स्वामी विवेकानंद यांनी १८९७ साली त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या नावाने लोकसेवेसाठी व लोक कल्याणासाठी त्यांनी "रामकृष्ण मिशन" ची स्थापना केली. ज्या वेळी ते परदेशातून भारतात परतले तेव्हा प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पृष्ठावर त्यांच चित्र होत, भारतात आल्या नंतर त्यांनी पुन्हा गरीब - पीडित लोकांची सेवा करणे आणि संस्कृतीचं काम करायला तीव्रतेने सुरुवात केली.
ज्या वेळी भारतात प्लेग नामक आजार आला तेव्हा सुद्धा लोकांच्या सेवेसाठी पैशाचा प्रश्न आला तर माठासाठी घेतलेली जमीन विकून टाकू ! आपण संन्यास त्यांनी सांगितले, आपण संन्यासी आहोत पुन्हा पहिल्या सारखे जंगलात राहू, असं त्यांनी सांगितले किती प्रेम भारत भूमी विषयी किती प्रेम भारतीय लोकांविषयी किती प्रेम ते भारतीय तत्वज्ञान प्रति हे आपल्याला (Swami Vivekanand) स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून लक्षात येते.
8. स्वामी विवेकानंद यांचा जीवन काळ: Swami Vivekanand & Ramkrishna mission full story.
स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) यांनी मठात शेकडो संन्यासाना भारतीय संस्कृती - वेद - तत्वज्ञान यांचं ज्ञान समजावले. ते म्हंटले होते - give me hundred nachiketa's i shall change the world।
(मला फक्त १०० नचिकेता द्या मी संपूर्ण जग बदलवून टाकेल)।
असं म्हणणारे स्वामी विवेकानंदच होऊ शकता.
"नचिकेता" हि खूप उच्चतम् स्थिती आहे, ते तुम्ही वेदांतात वाचू शकता.
लोकांच्या कल्याणासाठी - सेवेसाठी जीवन भर स्वतः झिजता झिजता लहान बालकाप्रमाणे जगदंबा मातेच्या कुशीत त्यांनी निद्रा घेतली. आणि अवघ्या ३९ वर्षाच्या जीवन काळात आजचा तरुण - चारित्र्य - व्यक्तित्व कसे असले पाहिजे हे दिसुन येते. अशा स्वामी विवेकानंदाना वंदन.
FAQ:
- swami vivekanand ka jivan
parichay
- swami vivekananda biography in hindi
- swami vivekananda ke vichar
- swami vivvekananda ki kahani
- swami vivekananda chicago speech in hindi
- swami vivekananda aur ramkrishna mission full story
0 टिप्पणियाँ
Thank you ! we will contact you